क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड : वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा धडाका

नांदेड : वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा धडाका

क्राइम
नांदेड| शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने मोठी मोहीम राबवत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहनचालक आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. या कारवाईत एकूण 287 प्रकरणे नोंदवून 2 लाख 81 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह रेल्वे स्टेशन रोड, वजिराबाद चौक, कलामंदिर वर्कशॉप, राज कॉर्नर आणि छत्रपती चौक या ठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली. या दरम्यान: अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विना परवाना / परमिट वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वेगाने वाहन चालवणे, ‘फटाका बुलेट’ (आवाज करणाऱ्या बाईक्स) यांच्यावर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात आली. तसेच ऑटोचालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस प्...
नांदेड शहरात कॉम्बिंग ऑपरेशन; 4 दिवसांत 88 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई

नांदेड शहरात कॉम्बिंग ऑपरेशन; 4 दिवसांत 88 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई

क्राइम
नांदेड| शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत सलग चार दिवसांत 88 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी रात्री 11 ते 10 एप्रिल पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या ऑपरेशनदरम्यान चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार आरोपी, हिस्ट्रीशीटर व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. 6 ते 10 एप्रिल दरम्यान राबवलेल्या मोहिमेत: एकू...
पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या पुढाकाराने २० वर्षांपासूनचा मिरवणूक प्रश्न मार्गी

पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या पुढाकाराने २० वर्षांपासूनचा मिरवणूक प्रश्न मार्गी

क्राइम, स्थानिक
लोहा| लोहा शहराजवळील पिंपळगाव ढगे व धानोरा (शे) या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याचा तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न केवळ दोन दिवसांत मार्गी लागला. पिंपळगाव ढगे येथे भीम जयंती मिरवणुकीवरून पूर्वी वाद निर्माण झाला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी शिष्टमंडळाने तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप व पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दोन्ही गावांतील ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले. गावात आयोजित बैठकीत दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी जुन्या वादांना बाजूला ठेवत शांततेच्या वातावरणात चर्चा केली. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून सर्वानुमते भीम जयंती सार्वजनिक पद्ध...
नांदेड : घरफोडी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : घरफोडी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 90 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दाखल गुन्हा क्रमांक 1195/2025, कलम 331(4), 305 भारतीय न्याय संहितेनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेख जुबेर ऊर्फ जेडी शेख खदीर (वय 23, रा. वाजेगाव, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथकासह ही मोहीम राबवली....
हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

क्राइम
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौका-चौकांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवावेत, अशी ठाम मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना तर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ताडेवाड, नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब तसेच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. CCTV कॅमेरे बसविल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस तांत्रिक पुरावे मिळतील. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांची ओळख पटेल आणि निर्दोष नागरिकांवर अन्याय होणार नाही.” मुख्यत्वे उमर चौक, आंबेडकर चौक...
अवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरात अवैध हत्यारे बाळगून फिरणाऱ्या दोन इसमांना विमानतळ पोलिसांनी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या मदतीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून पिस्टल, खंजर, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 8 एप्रिल रोजी कोम्बिंग ऑपरेशन व गस्तीदरम्यान करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन इसम अवैध हत्यारे बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मातागुजरी चौक परिसरात सापळा रचला. संशयितांना अडवून झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल, दोन खंजर, एक मोबाईल फोन व एक पल्सर मोटारसायकल आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे खुशालसिंग नानकसिंग गिल (वय 22, संभाजीनगर/नांदेड) व जयमितसिंग बलविरसिंग साहू (वय 22, हिंगोली/नांदेड) अशी आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 129/2026 अन्वये भारतीय हत्...
धर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

धर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
धर्माबाद| शहरात चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत धर्माबाद पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी धिरज गोवर्धन कासट (रा. बालाजी गल्ली, धर्माबाद) यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. ही घटना 4 एप्रिल रात्री 11.30 ते 5 एप्रिल पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. त्यानुसार धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 71/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गस्तीदरम्यान एका संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव लक्ष्मण सावलू बरसा (वय 25, रा. बासर, जि. निजामाबाद) असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल (MH 26 AE 9250) जप्त करण...
अवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका सराईत आरोपीस स्ट्रिट सेफ्टी पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून एक लोखंडी तलवार व पल्सर मोटारसायकल असा एकूण 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 8 एप्रिल 2026 रोजी गस्ती दरम्यान करण्यात आली. पोलिसांना मातागुजरी चौक परिसरात एक इसम संशयितरीत्या वावरताना दिसला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इश्वरसिंग मुखतारसिंग रंघवारा (राहणार अवचल नगर, नांदेड) असे सांगितले. संशयावरून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक अवैध लोखंडी तलवार आढळून आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, स्ट्रिट सेफ्टी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक भागवत नागरगो...
रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; हलगर्जीपणामुळे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; हलगर्जीपणामुळे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

क्राइम
नांदेड| शहरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेदरम्यान कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याचे आढळल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांतील वादातून जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातच त्याच्यावर पुन्हा हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला. या वेळी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करत संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असू...
हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हिमायतनगरमध्ये पैशांच्या वादातून तलवार-चाकूने हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील उमरचौक परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक, हिमायतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 8 एप्रिल 2026 बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी एकत्र येत चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावावर व काकावरही जीवघेणे वार करण्यात आले, ज्यामुळे त...
error: Content is protected !!