Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमनांदेड : घरफोडी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : घरफोडी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 90 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दाखल गुन्हा क्रमांक 1195/2025, कलम 331(4), 305 भारतीय न्याय संहितेनुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेख जुबेर ऊर्फ जेडी शेख खदीर (वय 23, रा. वाजेगाव, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पथकासह ही मोहीम राबवली.

दि. 09 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी वाजेगाव येथे आला आहे. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने घरफोडीची कबुली देत आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपीकडून दीड तोळे सोन्याचे दागिने व 85 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 3,90,332 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस मुद्देमालासह नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!