Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमअवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्ट्रिट सेफ्टी पथकाची कारवाई

नांदेड| शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका सराईत आरोपीस स्ट्रिट सेफ्टी पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून एक लोखंडी तलवार व पल्सर मोटारसायकल असा एकूण 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई 8 एप्रिल 2026 रोजी गस्ती दरम्यान करण्यात आली. पोलिसांना मातागुजरी चौक परिसरात एक इसम संशयितरीत्या वावरताना दिसला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इश्वरसिंग मुखतारसिंग रंघवारा (राहणार अवचल नगर, नांदेड) असे सांगितले. संशयावरून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक अवैध लोखंडी तलवार आढळून आली.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, स्ट्रिट सेफ्टी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात पार पडली.

दरम्यान, संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर खंडणी व मारामारीसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!