Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमधर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

धर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

धर्माबाद| शहरात चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत धर्माबाद पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी धिरज गोवर्धन कासट (रा. बालाजी गल्ली, धर्माबाद) यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. ही घटना 4 एप्रिल रात्री 11.30 ते 5 एप्रिल पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. त्यानुसार धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 71/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गस्तीदरम्यान एका संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव लक्ष्मण सावलू बरसा (वय 25, रा. बासर, जि. निजामाबाद) असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल (MH 26 AE 9250) जप्त करण्यात आली.

ही कारवाई अविनाश कुमार, अर्चना पाटील, सूरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!