शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

आरोग्य, शेती
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

शेती
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. आयडीशिवाय खत वितरण केले जाणार नाही. रासायनिक खतांवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असून वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. डिजिटल नोंदणी प्रणाली - या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पीक व योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी क्रमांक किंव...
नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान

शेती
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हा सन्मान ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या 23 व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदे...
पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर १५ एप्रिलला डिजिटल शेतीशाळा-३

पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनावर १५ एप्रिलला डिजिटल शेतीशाळा-३

शेती
पुणे/नांदेड| शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपाययोजनांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल ...
केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

शेती
शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड|मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा ...
अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

शेती
नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्र...
हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

शेती
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणग्रस्त पांदण (शेत) रस्ते तात्काळ खुले करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक शासकीय पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. परिणामी शेतीकामासाठी आवश्यक अवजारे, यंत्रसामग्री ने-आण करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर रस्ते बंद झाल्याने शेती पडीत राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचबरोबर रस्त्यांच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तणाव आणि भांडणे वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, शासनाने पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, रस्त्याचे नुकसान करणाऱ्या किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आह...
वादळी पावसाने हिमायतनगर तालुका हादरला; वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान

वादळी पावसाने हिमायतनगर तालुका हादरला; वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान

शेती
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लावली. रात्री सुमारे अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरासह ग्रामीण भाग हादरून गेला. तुफान वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी विजवाहिनीच्या तारा तुटून पडल्या, तर लहान-मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. परिणामी हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात जागून काढावी लागली. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची सुरुवात झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या वादळाचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी आंबा, चिकू यांसारख्या फळबागांचे मोठे ...
नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

शेती
नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या ताज्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात 30 व 31 मार्च तसेच 1 व 3 एप्रिल 2026 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काय करावे? वादळ व विजांचा अंदाज असल्यास बाहेर जाणे टाळा, सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत बसून डोके गुडघ्यात घ्या, घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, विद्युत उपकरणे त्वरित बंद करा, लोखंडी वस्तू, विजेचे खांब व तारांपासून दूर राहा, पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर पडा काय करू नये? विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका, पाण्याच्या नळा...
error: Content is protected !!