भोकर न्यायालयात वकिलाला मारहाण; हिमायतनगर वकिल संघ आक्रमक
न्यायालयाच्या आवारातच वकिलाला शिवीगाळ, मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी; आरोपींवर कडक कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर, प्रतिनिधी| न्यायालयाच्या पवित्र परिसरातच वकिलाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कथित प्रकारामुळे कायदा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. भोकर न्यायालयात केसकामी गेलेल्या अधिवक्ता विनोद रेड्डी यांना एका आरोपीने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा हिमायतनगर अधिवक्ता संघाने तीव्र निषेध नोंदवत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी हिमायतनगर अधिवक्ता संघाची तातडीची बैठक अध्यक्ष अॅड. अतुल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत घटनेचा एकमताने निषेध ठराव मंजूर करण्यात आला.
न्यायालयातच वकील असुरक्षित असेल तर सामान्य नागरिकांच्या ...




