Tag: धडक कारवाई

महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाई

महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाई

क्राइम
मोर चौक ते छत्रपती चौक मार्ग अतिक्रमणमुक्त नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहिम हाती घेतली असून त्याअंतर्गत मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मोर चौक ते छत्रपती चौक या महत्त्वाच्या मार्गावर संयुक्त कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस विभागाच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा केला. उत्तर नांदेड भागासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या कारवाईमुळे रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनीही अतिक्रमण न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शहरातील इतर भागांतही अशीच धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे काही ठिकाणी तणाव...
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा, ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा, ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस यांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान छापा टाकत पाच जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तब्बल ४ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाउन’ अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापासून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. २३ एप्रिल रोजी पहाटे सुमारे १२.२० वाजता वाजेगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाजेगाव–मुदखेड रोडवरील आर.के. पेट्रोल पंपाजवळ मुरादकोल डेपोसमोरील मोकळ्या जागेत छापा टाकला. येथे काही इसम ‘तिरट’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगा...
नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर पहाटे धडक कारवाई; इंजिन-बोट स्फोट करून नष्ट

नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर पहाटे धडक कारवाई; इंजिन-बोट स्फोट करून नष्ट

क्राइम
नांदेड| अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने सोमवारी पहाटे मोठी कारवाई करत मौजे भनगी येथे नदीपात्रात धाड टाकली. या कारवाईत अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन आणि एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे 13 लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात पार पडली. नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाला बसणारा फटका लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पावले उचलली. कारवाईत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, ...
कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

क्राइम
12 जणांवर गुन्हा; 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 एप्रिल रोजी सायंकाळी पिंपळगाव (कु) शिवारातील दगडे यांच्या शेताजवळ करण्यात आली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे काही इसम ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. त्यानुसार कुंडलवाडी पोलीसांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 24,400 रुपये रोख रक्कम, 52 पत्ते, 4 मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. 43/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोना/22...
नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 394 केसेस, 4.48 लाखांचा दंड वसूल

नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 394 केसेस, 4.48 लाखांचा दंड वसूल

क्राइम
अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई नांदेड| शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखा वजिराबाद आणि इतवारा पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत एकूण 394 प्रकरणे नोंदवून 4 लाख 48 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरात सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना/परमिट वाहने, ट्रिपल सीट, भरधाव वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणारे अनधिकृत फळ गाडे व हातगाडे यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. शहर वाहतूक शाखा इतवारा येथील पोलीस निरीक्षक जगन पवार यांनी जुना मोंढा, हबीब टॉकीज, बकी चौक परिसरात तपासणी मोहीम राबवून 42 प्रकरणे नोंदवली व 46,500 रुपयांचा दंड आकारला. तर शहर वाहतूक शाखा वजिराबादचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांन...
सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा

सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा

क्राइम
नांदेड | नांदेड ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो टाकून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल 15 गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार सोशल मीडिया अकाउंट्सचे निरीक्षण करण्यात येत होते. तपासादरम्यान काही व्यक्तींनी इंस्टाग्रामवर खंजर, तलवार, गावठी कट्टा यांसह फोटो पोस्ट करून ते व्हायरल केल्याचे आढळले. तसेच काही आरोपींनी आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट केल्याचेही समोर आले. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 333, 335, 340/2026 (कलम 3/25 शस्त्र अधिनियम) गु.र.नं. 334 ते 348/2026 (कलम 4/25 शस्त्र अधिनियम) अशा एकूण 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 15 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून काही आरोपी अद्याप अनोळखी आहेत. पोलीस निरीक्षक ओ...
error: Content is protected !!