Tag: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

सामाजिक
अर्धापूर| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजांचे प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले. येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समता, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. भीमजयंती साजरी करताना केवळ एक दिवसापुरता उत्साह न ठेवता तो वर्षभर टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचन संस्कृती वाढवून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर गाथा पठनाचा कार्यक्रम पार पडल...
मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती

मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती

लेख, स्थानिक
भारतीय समाजजीवनाच्या प्रदीर्घ इतिहासात स्त्रीच्या वाट्याला अनेकदा अंधारच आला. तिच्या हातात कर्तव्यांची ओझी होती, पण अधिकारांची शिदोरी नव्हती. तिच्या डोळ्यांत स्वप्ने होती; परंतु त्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश नव्हते. तिच्या कुशीत संसार जन्म घेत होता, पण तिच्या स्वतःच्या जीवनाला सन्मानाचे स्थान दिले जात नव्हते. कधी परंपरेच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली, तर कधी समाजव्यवस्थेच्या कठोर चौकटीत स्त्रीला केवळ सहन करणे, गप्प राहणे आणि आयुष्यभर झिजत राहणे— एवढेच जणू तिच्या वाट्याला आले होते. शतकानुशतके चालत आलेल्या या मूक वेदनेने तिच्या अस्तित्वावर जणू सावली टाकली होती. अशा या वेदनांनी व्यापलेल्या काळात एक महामानव उभा राहिला—भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रीच्या डोळ्यांतले अश्रू पाहिले आणि त्या अश्रूंमागची असह्य वेदना ओळखली. त्यांनी स्त्रीकडे दयेने नव्हे, तर न्यायाच...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महाराष्ट्र
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विचार समाजात पोहोचण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर कविता मुळे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अं...
error: Content is protected !!