Tag: खा. अशोकराव चव्हाण

जिल्हा परिषदेत विकासकामांचा आढावा; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जिल्हा परिषदेत विकासकामांचा आढावा; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राजकारण
नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विविध विकासकामांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन, वॉटर ग्रीड योजना, रस्ते विकास, पाणंद रस्ते, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच रोजगार हमी योजनेतील कामांवर विशेष चर्चा करण्यात आली. खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती आणि त्यामधील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस अर्धापूर भाजपा तालुकाध्य...
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्याकाँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा-खा. अशोकराव चव्हाण

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्याकाँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा-खा. अशोकराव चव्हाण

राजकारण
नांदेड| महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर विधानसभा ,लोकसभेत अनेक कर्तृत्वान महिलांना संधी मिळाली असती. यातून राज्य व देशाच्या विकासात त्यांना भरीव योगदान देता आले असते. मात्र क्रेडिट मोदी सरकारला जाईल या राजकीय हेतूने महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचाईत समिती निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे नारीशक्ती वंदन कार्यक्रम व महानगर जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवार दि. 1 मे रोजी सायंकाळी पाच वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ,तथा जिल्हा प्रभारी माजी आ. सुनील राणे, आ.श्रीजया चव्हाण ,प्रदेश उपाध्य...
नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडा; खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडा; खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

राजकारण
रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा नांदेड| भारतीय रेल्वेने 'दक्षिण तटीय रेल्वे' या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर नांदेड रेल्वे विभाग 'मध्य रेल्वे'ला जोडण्याची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून त्यानंतर दूरध्वनीद्वारे चर्चा केली. दक्षिण तटीय रेल्वे झोनच्या निर्मितीनंतर दक्षिण मध्य रेल्वेतील सध्याच्या सहा विभागांपैकी तीन विभाग नवीन झोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत, तर नांदेडसह उर्वरित तीन विभाग दक्षिण मध्य रेल्वेकडेच कायम ठेवण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे पाचही विभाग मुंबई मुख्यालय असलेल्या 'मध्य रेल्वे' झोनमध्ये असताना केवळ नांदेड विभाग...
आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली; खा. अशोकराव चव्हाण यांनी आठवणींना दिला उजाळा

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली; खा. अशोकराव चव्हाण यांनी आठवणींना दिला उजाळा

महाराष्ट्र
नांदेड| स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी व्यक्त केलेली नांदेड भेटीची इच्छा त्यांच्या निधनामुळे अपूर्णच राहिली. त्यांच्या या अपूर्ण इच्छेची हळहळ व्यक्त करत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आशाताईंनी “मला नांदेडला यायचं आहे, सचखंड गुरुद्वारा (Sachkhand Gurudwara) येथे दर्शन घ्यायचे आहे. आपण लवकरच कार्यक्रम ठरवूया,” असा शब्द दिला होता. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली, असे चव्हाण यांनी भावुक शब्दांत सांगितले. सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी आशाताईंशी असलेल्या स्नेहबंधांचा विशेष उल्लेख केला. ९०च्या दशकात आशाताई नांदेडला आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले. कोरोना काळानंतर प्रसाद महाडकर यांच्या माध्यमातून आशाताईंशी द...
अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

राजकारण
नांदेड|महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या नांदेड जिल्हा पाहणी दौऱ्यात जिथे अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळला असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अंदाज समितीच्या दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावर खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, समितीने त्यांचा अहवाल नियमानुसार विधीमंडळाला सादर करून अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी, कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला किंवा गैरव्यवहाराला पाठीशी घालता कामा नये, हीच माझी भूमिका आहे. उलटपक्षी अंदाज समितीला आढळलेल्या गैरव्यवहारांची माहिती सार्वजनिक करणे शक्य असेल तर आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर चौकशीसाठी पाठपुरावा करू. अंदाज समितीला आढळलेल्या प्रत्येक गैरव्यवहाराची सत्यता समोर आली पाह...
इनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा!

इनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा!

राजकारण
नांदेड| नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या थेट घरांशी आणि जमिनींशी निगडित असलेल्या तीन महत्त्वाच्या विषयांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पत्र लिहिले असून, ही कामे निश्चित कालमर्यादेत वेगाने पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, इनाम जमिनी नियमित करून घेण्याबद्दल राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी नियमाकूल करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुढील कार्यवाही सुरु करावी, तसेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नांदेड शहर...
वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

राजकारण
नांदेड | नांदेड शहरात गेल्या 72 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत वाढत्या गुन्हेगारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरात अल्पावधीत इतक्या गंभीर घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शासकीय रुग्णालय परिसरातही हत्यांसारख्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणातील सर्व हत्याकांडांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्य...
भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

राजकारण
नांदेड| भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. गांधी पुतळ्याजवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख तसेच महापौर कविताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक “वंदे मातरम्” गीताने झाली. या प्रसंगी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त कार्यालयाची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त...
error: Content is protected !!