Tag: हिमायतनगर

गंगाई सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

गंगाई सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

सामाजिक
मुंबई/नांदेड/नायगांव/हिमायतनगर| समाजातील व्यसनमुक्तीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिमायतनगर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा गौरव २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, प्रधान सचिव डॉ. सिद्धोधन कांबळे तसेच समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सचिव प्रा. गोपाळराव विठ्ठलराव हरडपकर व सौ. अश्विनी गोपाळराव हरडपकर यांनी स्वीकारला. गेल्या दहा वर्षांपासून हि संस्था व्यसनमुक्ती अभियान, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरे तस...
गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर/हदगांव| तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रयत सेवाभावी प्रतिष्ठान, जवळगाव तर्फे मौजे महाताळा (निवघा बाजारजवळ, ता. हदगाव, जि. नांदेड) येथील एका गरजू कुटुंबासाठी मदतीचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. चि. सौ. का. वैष्णवी गजानन रुमाले हिच्या विवाहासाठी तिच्या आईने प्रतिष्ठानकडे कळकळीची विनंती केली आहे. दिनांक 24 मार्च 2026 रोजी संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवार (जवळगावकर), अरुण पाटील चक्रीकर व संतोष पाटील सूर्यवंशी यांनी महाताळा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान समोर आलेली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. वधूच्या वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्या वेळी वैष्णवी अवघी 6 वर्षांची, तिची बहीण 4 वर्षांची आणि भाऊ केवळ 2 महिन्यांचा होता. या घटनेनंतर तीन लहान लेकरांची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. घरची परिस्थिती ...
सारजाबाई ठाकुर यांचे निधन; सरसम बु. गावावर शोककळा

सारजाबाई ठाकुर यांचे निधन; सरसम बु. गावावर शोककळा

स्थानिक
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री वामनराव मोरे ठाकुर महाराज यांच्या मातोश्री सारजाबाई रामचंद्र मोरे ठाकुर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे, सुना व नातसुना असा मोठा परिवार आहे. सारजाबाई या शांत, सोज्वळ व आपुलकीने वागणाऱ्या जुन्या पिढीतील आदर्श गृहिणी होत्या. साधी राहणी, नीटनेटकेपणा, डोक्यावर पदर आणि आदरयुक्त बोलणे ही त्यांची ओळख होती. कुणालाही दुखावू नये, हीच त्यांची जीवनशैली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सरसम (बु.) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ..भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏ॐ शांती 🌺...
आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

राजकारण
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामागे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची म्हणी लावून धरली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आह...
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्या; हिमायतनगरात पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्या; हिमायतनगरात पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे. युवा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव किशन शिंदे यांनी यासंदर्भात निवेदन देत ३१ मार्च २०२६ पासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही दोन वेळा याच मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. “जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इ...
हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण हिमायतनगर येथे पाहायला मिळाले. बोऱगडी येथील शेतकरी प्रभू शेणेवाड यांची हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत देत काही तरुणांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शेतकरी प्रभू शेणेवाड यांनी हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी संदीप पळशीकर यांच्या अभिषेक ट्रेडिंग कंपनी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. त्या गडबडीत त्यांची 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी हरवली. बराच शोध घेतल्यानंतरही अंगठी सापडत नसल्याने त्यांनी ती हरवली असे गृहित धरले होते. दरम्यान, हिमायतनगर येथे वाहन भरताना रमेश बनसोडे यांच्यासोबत काम करणाऱ्या फकीरा सोळंके यांना ती अंगठी सापडली. कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत संबंधित शेतकऱ्याचा शोध घेत अंगठी परत केली. ...
आईच्या कष्टांना यशाची किनार

आईच्या कष्टांना यशाची किनार

माहिती, स्थानिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांचे मोल जाणणाऱ्या मुलाची कहाणी म्हणजे सरसम बु. येथील रोहित संदीप बिच्चेवार यांचे यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित यांनी नांदेड जिल्हा पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरावर दुःखाचे सावट आले होते. मात्र या कठीण काळात त्यांच्या आईने हार न मानता कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. “मुलांना शिकवून मोठे करायचे” या निर्धाराने त्यांनी रोहितला सतत प्रेरणा दिली. आईचे कष्ट आणि संघर्ष पाहून रोहित यांनीही स्वतःला अभ्यास व मैदानी चाचण्यांसाठी पूर्णतः झोकून दिले. या अथक परिश्रमाचे फळ मिळत रोहित यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि काका यांना दिले आहे. रोहितच्या या य...
हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद

हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे उद्या नववी बौद्ध धम्म परिषद

धर्म अध्यात्म
नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील सोनारीफाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने रविवारी (दि. २९ मार्च) एकदिवसीय नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत धम्मदेसना, मान्यवरांचा गौरव, व्याख्याने तसेच ख्यातनाम शाहिरांच्या समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार मेळा रंगणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिषदेची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहणाने होणार असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर पुज्यनिय भन्ते पय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी प्रा. डॉ. जे. टी. जाधव व प्रा. डॉ. विजय गोणारकर यांची विचारप्रवर्तक व्याख्याने होणार आहेत. दुपारी २ वाजल्यापासून बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून भिमशाहीर माध...
error: Content is protected !!