महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्या; हिमायतनगरात पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

मुन्नाभाऊ शिंदे यांचं दिनांक 31 पासून तिसऱ्यांदा आमरण उपोषणास होणार प्रारंभ

हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे.

युवा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव किशन शिंदे यांनी यासंदर्भात निवेदन देत ३१ मार्च २०२६ पासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वीही दोन वेळा याच मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

“जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!