
कंधार, सचिन मोरे| कंधार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला असून आगामी काळामध्ये शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात सुशोभीकरण करून कंधार शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ४१.५१ लक्ष रुपये कामाचे सुशोभीकरण करणे या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी दुपारी संपन्न झाले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामराव पवार,तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय भोळे, नांदेड जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, युवा नेते स्वप्निल पाटील लुंगारे, न.पा.उपाध्यक्ष मन्नान चौधरी, माजी नगराध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुहास कांबळे, नगरसेवक पिंटू कदम, मयूर कांबळे, गंगाधर कांबळे, राजकुमार केकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.



प्रारंभी जयंती मंडळाच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून भव्य असा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सत्कारास उत्तर देताना आमदार चिखलीकर म्हणाले कि, कंधार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी कंधार येथील जनतेची होती. त्यांच्या मागणीचा आदर करत आज पुतळा सुशोभीकरण कामाची भूमिपूजन संपन्न झाले असून मी खासदार असताना कंधार शहरातील महाराणा प्रताप यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी ७० लक्ष रुपयाचा निधी दिला असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.



त्याचबरोबर लोहा येथे भव्य दिव्य असे चार कोटी रुपये खर्चून बौद्ध विहार बांधण्यात आले असून हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. हे विहार पाहण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भीमसैनिक लोहा येथे येत आहेत.
कंधार येथे बुद्ध विहार ला जागा कमी आहे तरी देखील हे विहार चांगले व भव्य झाले पाहिजे. अशी अपेक्षा आहे येणाऱ्या काळात शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण लवकरच करून शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्याची ग्वाही आमदार चिखलीकर यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.
