करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; 100 मीटर परिसरात कडक निर्बंध

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; 100 मीटर परिसरात कडक निर्बंध

करियर
नांदेड| राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षा-२०२६ पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील परीक्षा केंद्र परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षेचे वातावरण शांत, सुरक्षित आणि पारदर्शक राहावे यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. एमबीए/एमएमएस तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यास-क्रमांसाठी एमएच-सीईटी परीक्षा नांदेड शहरात दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. पहिला टप्पा ६ ते २६ एप्रिल २०२६, तर दुसरा टप्पा ९ ते १९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत पार पडणार आहे. तीन परीक्षा केंद्रांवर निर्बंध - नांदेडमधील तीन परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात हे आदेश लागू असतील , ज्ञानदीप...
संघर्षातून यश; शेतकरी कन्या ऐश्वर्या कल्याणकर बनली डॉक्टर, गावाचा अभिमान वाढवला

संघर्षातून यश; शेतकरी कन्या ऐश्वर्या कल्याणकर बनली डॉक्टर, गावाचा अभिमान वाढवला

करियर
नांदेड, संघरत्न पवार| जिल्ह्यातील तरोडा खुर्द या छोट्याशा गावातून अभिमानास्पद आणि प्रेरणादायी यशाची कहाणी समोर आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कुटुंबातील लेक ऐश्वर्या किशनराव कल्याणकर हिने एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करत डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या ऐश्वर्याने डॉक्टर होण्याचा निर्धार केला होता. आर्थिक अडचणी, ग्रामीण भागातील मर्यादा आणि संघर्षमय परिस्थिती यांचा सामना करत तिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळवलं. तिच्या या यशामागे शेतकरी वडील किशनराव कल्याणकर यांच्या कष्टांची आणि पाठिंब्याची मोठी भूमिका आहे. ऐश्वर्याने केवळ स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं नाही, तर कुटुंबाचं आणि संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. तिच्या यशामुळे तरोडा खुर्द गावात आनंदाचं वातावरण असून गावकऱ्यांकडून तिच्याव...
पत्रकार डॉ. मोहसीन खान यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार

पत्रकार डॉ. मोहसीन खान यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार

करियर
मुंबई /नांदेड| बिलोली येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहसीन खान मुजीबपाशा यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथील नरिमन पॉईंट स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित भव्य समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०२१-२२ या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या या पुरस्कारांतर्गत डॉ. खान यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बिलोली तालुक्याच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. मोहसीन खान हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त...
नवज्योत फाउंडेशनच्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

नवज्योत फाउंडेशनच्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

करियर
नांदेड (गोविंद मुंडकर) नवज्योत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा समारोप रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून सभागृह तिन्ही दिवस विद्यार्थीांनी खचाखच भरलेले होते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर समाजातील विविध अनिष्ट प्रवृत्ती आणि समस्यांवरही वक्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सजग आणि जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले. रविवारी झालेल्या समारोप सत्रात वेदांत देशमुख, सरदार उदयपाल, अश्विनी मंठाळकर ,सरदार हरजीत सिंघ आणि सरदार दीपसिंह फौजी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांच्या प्रेरणा...
बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

करियर
नांदेड| बोगस नोकरभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले. 81 वर्षीय संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गणपतराव कदम यांच्या उपोषणासमोर प्रशासन झुकल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, कंधारचे अध्यक्ष व्यंकटराव कदम यांनी 23 मार्चपासून 17 मागण्यांसह दोन प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. यामध्ये बोगस नोकरभरती, बदली व पदोन्नती रद्द करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच बोगस शालार्थ आयडी रद्द करून शासनाचे नुकसान वसूल करण्याची मागणी होती. प्रशासनाचे लेखी आश्वासन - 27 मार्च रोजी सायंकाळी शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप रावजी बनसोडे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांशी चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित संस्थेतील अनियमिततेबाबत अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर केल...
error: Content is protected !!