क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अवैध सावकारी प्रकरणात ५ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

अवैध सावकारी प्रकरणात ५ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

क्राइम
नांदेड| अवैध सावकारी व्यवसाय करून पैसे वसुलीसाठी नागरिकांना डांबून ठेवत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर (गु.र.नं. 165/2026) व अर्धापूर (गु.र.नं. 171/2026) येथे भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी रात्रगस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार साठे चौक परिसरातील खालसा फायनान्स व गुरुकृपा ट्रेडर्स कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्य...
RPF-जीआरपीची संयुक्त कारवाई

RPF-जीआरपीची संयुक्त कारवाई

क्राइम
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत प्रवासी व रेल्वे सुरक्षेसंदर्भात मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने रेल्वे यार्डमधून सुमारे ३० मीटर कॅटेनरी वायर (तांबे) आणि ७.५ मीटर डिस्चार्ज केबल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध RP(UP) कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये घडलेल्या उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणात RPF आणि GRP च्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका महिला प्रवाशाची सुमारे ७.२० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीचे दागिने व हिरे असलेली पर्स ट्रेनमध्ये हिसकावून नेण्यात आली होती. या प्रकरणात आर...
सोनारी फाटा येथे पुन्हा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

सोनारी फाटा येथे पुन्हा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

क्राइम
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील वार्डक्रमांक 3 मधील रहिवाशी युवक सदाम आपल्या वाहनाने जात असताना सोनारी फाट्यावर अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. सोनारी फाटा हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून, येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. विशेषतः स्पीड ब्रेकर नसल्यामुळे किंवा योग्य संकेत चिन्हांच्या अभावामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सोनारी फाटा चौरस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची आणि आवश्यक स...
पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
बॅग लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी ताब्यात

बॅग लिफ्टिंग टोळीचा पर्दाफाश; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी ताब्यात

क्राइम
नांदेड| शहरात वाढत्या बॅग लिफ्टिंग घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून २ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भ्रतरीनाथ उर्फ भरत रवींद्र पवार (वय २५), नागेश छत्रपती वाहूळकर (वय १९) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असून काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे...
वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त

वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत तब्बल १७ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹३.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर कैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कशी उघडकीस आली चोरीची मालिका? फिर्यादी मोहम्मद जुनेद कुरेशी (रा. देगलूर नाका, नांदेड) यांची मोटारसायकल १६ मार्च रोजी चिखलवाडी परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. हिंगोली गेट परिसरात दोन संशयित मुलं चोरीच्या मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळ...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
नायगाव येथे अवैध शस्त्र प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, गावठी पिस्टल जप्त

नायगाव येथे अवैध शस्त्र प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, गावठी पिस्टल जप्त

क्राइम
नांदेड | नायगाव परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. ही कारवाई दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नायगाव जवळील कंडाळा फाटा परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून १) प्रल्हाद उर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी तम्मा, ता. नायगाव) २) रवि धोंडिबा देवकांबळे (वय २१, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस का...
नांदेडमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव

नांदेडमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गांजा तस्करीचे रॅकेट उधळून लावले आहे. नांदेड पोलीस (Nanded Police) यांच्या या धडक कारवाईत सुमारे ₹६,७५,५०० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २८ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ₹२,२५,५०० इतकी असून, यासोबतच स्विफ्ट डिझायर कार ४, ५०, ००० असा एकूण ₹६,७५,५०० चा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी रवी बाबुराव वाघे (रा. भोक्कर) आणि एक अन्य आरोपी यांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (Avinash Kumar) यांच्या मार्...
नांदेडमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा धडाका; ५ लाखांचा साठा जप्त

नांदेडमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा धडाका; ५ लाखांचा साठा जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखू पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, सुमारे ५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेड पोलीस (Nanded Police) यांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात बसला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ मार्च २०२६ पासून नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ३१ मार्च रोजी इस्लामपूरा भागात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. छाप्यात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी सुमारे ₹५,०३,७४० किंमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी मोहम्मद शोएब मोहम्मद अकबर (मंदिरा नगर, देगलूर नाका) याच्यासह इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान शेख अमीर (ह...
error: Content is protected !!