Sunday, April 5, 2026
Google search engine
Homeक्राइमनांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून; रुग्णालयातही रक्तरंजित सूडनाट्य

नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून; रुग्णालयातही रक्तरंजित सूडनाट्य

नांदेड| शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केलं असून, शुक्रवारी मध्यरात्री तिहेरी खूनाची थरारक घटना घडली आहे. दोन प्रतिस्पर्धी गटांतील वर्चस्वाच्या वादातून सुरू झालेल्या हिंसक संघर्षात प्रथम दोघांचा निर्घृण खून झाला, तर काही तासांतच रुग्णालयात घडलेल्या सूडाच्या हल्ल्यात तिसऱ्याचा जीव गेला. या सलग घटनांमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कॅनाल रोड परिसरातील ई-स्क्वेअर सिनेमागृहाजवळ रात्री उशिरा दोन गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी धारदार शस्त्रांचा वापर करत जोरदार हल्ला करण्यात आला. या भीषण झटापटीत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथेच सूडाची आणखी एक थरारक घटना घडली. मृतांपैकी एकाच्या नातेवाईकाने मध्यरात्री रुग्णालयात घुसून उपचार घेत असलेल्या जखमीवर हल्ला केला. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला. रुग्णालया सारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पुरावे गोळा केले असून, प्रयोगशाळेचे पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात हा संपूर्ण प्रकार गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सलग घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!