Tag: बिलोली

बिलोलीत स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट तांदूळ

बिलोलीत स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट तांदूळ

राजकारण
नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची कारवाईची मागणी बिलोली| तालुक्यातील तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असल्याच्या तक्रारींना उधाण आले असून, यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट असून काही ठिकाणी दगड-माती मिश्रित असल्याचे दिसून येते. तसेच काही वेळा तांदळाला दुर्गंधी येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने निकृष्ट धान्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती ...
भीम अनुयायांच्या निर्धाराने ३ तासांत अतिक्रमण हटले ; जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग

भीम अनुयायांच्या निर्धाराने ३ तासांत अतिक्रमण हटले ; जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग

सामाजिक
 जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग बिलोली| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बिलोलीत घडलेली अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही केवळ प्रशासकीय कृती न राहता, सामाजिक जागृतीचा ठसा उमटवणारी घटना ठरली आहे. भीम अनुयायांच्या ठाम भूमिकेमुळे आणि महिलांच्या तीव्र सहभागामुळे अवघ्या तीन तासांत अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाला भाग पडले. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागरिक एकवटले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न केवळ निवेदनांनी सुटला नव्हता; मात्र यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण केला. त्यांच्या या शांततामय पण ठाम आंदोलनामुळे प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली. शहरातील पोलीस स्टेशन समोरील, तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती गेटसमोरील अतिक्रमण हटवणे पोलीस आणि प्रशासनाला जमले नाही. या पार्श्वभूमीवर आता नागरि...
बिलोलीत कुंचनवार परिवार आणि शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई

बिलोलीत कुंचनवार परिवार आणि शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई

सामाजिक
बिलोली (प्रतिनिधी) कै.व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मरणार्थ आणि बिलोली शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने बिलोली शहरात जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी पाणपोईचे यंदाही मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गत 35 वर्षापासून ही पाणपोईची परंपरा जोपासली गेली आहे. शहर विकासाचा ध्यास घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती काम करते. त्याच अनुषंगाने कै. व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी पाणपोईचे स्टॉल लावून तहानलेल्यांची तृष्णा भागविली जाते. या सामाजिक कार्यास 35 वर्षाचा इतिहास आहे. हीच परंपरा यंदाही उष्णतेची तीव्रता पाहून आणि या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना पिण्यास पाणी मिळावे या हेतूने कायम राखण्यात आली. बिलोली शहर विकास कृती समितीतर्फे शुक्रवारी जुना बस स्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्...
हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

धर्म अध्यात्म
हनुमान जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वैभवाचे दर्शन घडवणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या पवित्र निमित्ताने बिलोली शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी कुस्त्यांची स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ती शौर्य, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. बिलोलीतील कुस्त्यांची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी असून, या परंपरेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मातीच्या आखाड्यात घडणारी ही कुस्ती केवळ शरीराची ताकद दाखवणारी नसून, ती मानसिक स्थैर्य, शिस्त आणि संस्कारांची जोपासना करणारी आहे. गावोगावी आणि जिल्ह्याजिल्ह्यातून येणारे कुस्तीपटू आपल्या कलेचा कस लावण्यासाठी येथे एकत्र येतात आणि त्यामुळे हा सोहळा एक भव्य क्रीडामहोत्सव ठरतो. या परंपरेचा वारसा जपण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते....
बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

सामाजिक
बिलोली,गोविंद मुंडकर| शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत गरजेवरच प्रशासकीय हलगर्जीपणाचे सावट आले असून, पाणपोईसाठी जागा उपलब्ध करून देण्यात बिलोली नगर परिषद अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, दुसरीकडे पाणपोईसारख्या अत्यावश्यक उपक्रमासाठी जागा न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती आणि माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार यांच्या पुढाकारातून सुरू असलेला पाणपोईचा उपक्रम हा केवळ परंपरा नसून, तो हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे. उन्हाळ्याच्या कडक पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. मात्र, याच उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाची होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषद परिक्षेत्रातील महसूल ...
“परंपरेचा अभिमान, नव्या युगाची शान – बिलोलीची कुस्ती पुन्हा सज्ज!”

“परंपरेचा अभिमान, नव्या युगाची शान – बिलोलीची कुस्ती पुन्हा सज्ज!”

क्रीडा
बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहराची कुस्ती परंपरा ही केवळ क्रीडा नसून संस्कृतीचा जाज्वल्य वारसा मानली जाते. तब्बल शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या भूमीने अनेक नामांकित पैलवान घडवले असून, कुस्तीच्या माध्यमातून बिलोलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जंगी कुस्त्यांनी इतिहास रचला होता. नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या ५१ हजार रुपयांच्या इनामी कुस्तीपासून ते बी.पी. नरोड दादा (३१ हजार) आणि अभिजीत तुडमे (२१ हजार) यांच्या लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी शंकर भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील पैलवान सहभागी झाल्याने स्पर्धेचा दर्जा उंचावला होता. पूर्वीच्या काळात कुस्तीनंतर नाच-गाण्याची परंपरा होती. कालांतराने ती लोप पावली होती; मात्र नगरसेवक प्रतिनिधी गंगाधर पप्पुलवार यांच्या ...
error: Content is protected !!