Tag: बालविवाह

अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

सामाजिक
१०९८ हेल्पलाईनवर कळवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली| येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या निशुल्क हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षां...
बालविवाहाच्या प्रश्नावर मराठवाडा देशात आघाडीवर- हेरंब कुलकर्णी

बालविवाहाच्या प्रश्नावर मराठवाडा देशात आघाडीवर- हेरंब कुलकर्णी

करियर
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक प्रगतीच्या अनेक मापदंडांवर मराठवाड्याची ओळख ठळकपणे समोर येत नसली, तरी बालविवाहाच्या समस्येत हा प्रदेश देशात गंभीरपणे आघाडीवर असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषद आणि आयआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देशातील सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, यातील १७ जिल्हे महाराष्ट्रातील असून, त्यापैकी तब्बल ८ जिल्हे मराठवाड्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी ४८ टक्क्यांपर्यंत बालविवाह होत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता ही या समस्येची मुळ कारणे असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महाराष्ट्राने मुलींच्या शिक्षणाची पहिल...
error: Content is protected !!