132 केव्ही उपकेंद्र असतानाही खानापूरमध्ये लोडशेडिंग; नागरिकांचा संताप
खानापूर/देगलूर/नांदेड, माणिक रायकोडे | राज्यात विजेची कमतरता नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना खानापूर येथे अचानक साडेतीन तासांच्या लोडशेडिंगला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "वीज उशाला, कोरड कशाला?" असा सवाल उपस्थित करत खानापूरकरांनी वीज वितरण कंपनीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
खानापूर येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले असूनही स्थानिकांना अंधारात राहावे लागत आहे. दुसरीकडे शेजारील एमआयडीसी परिसराला अखंड वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांनी दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १३२ केव्ही उपकेंद्रासाठी गावातील गायरान व शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी खानापूरमध्ये भविष्यात वीजटंचाई भासणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावर...


