Tag: धर्माबाद

धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) धर्माबादचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर यांनी अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर तसेच धर्माबाद आणि बिलोली येथील मराठवाडा जनहित पक्षाविरोधात सीबीआय कार्यालयासमोरून केलेल्या कथित आरोपांमुळे बिलोली शहर व तालुक्यात मोठे पडसाद उमटले आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता बिलोली येथे संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत बेळकोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आरोपांमुळे सार्वजनिक जीवनात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, सुरेंद्र बेळकोणीकर यांनी नेमके कोणते आरोप केले, त्यामागील तथ्य काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर प्रसारि...
धर्माबाद तालुक्यात गांजाची शेती उघड; ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त, आरोपी अटकेत

धर्माबाद तालुक्यात गांजाची शेती उघड; ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त, आरोपी अटकेत

क्राइम
धर्माबाद | नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात अवैध गांजा लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतामधून तब्बल ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे करखेली येथील शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यामध्ये आरोपी निशांत पंडीत कदम (वय ५०, रा. करखेली, ता. धर्माबाद) याच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली. उग्र वास येणारी हिरवी, ओलसर झाडे जप्त करून त्याचे वजन केले असता एकूण ७ किलो १६५ ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत (कलम ८(क), २०(ब)) गुन्हा दाखल करण्यात आला अ...
धर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

धर्माबाद पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
धर्माबाद| शहरात चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत धर्माबाद पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी धिरज गोवर्धन कासट (रा. बालाजी गल्ली, धर्माबाद) यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. ही घटना 4 एप्रिल रात्री 11.30 ते 5 एप्रिल पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. त्यानुसार धर्माबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 71/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गस्तीदरम्यान एका संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे नाव लक्ष्मण सावलू बरसा (वय 25, रा. बासर, जि. निजामाबाद) असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल (MH 26 AE 9250) जप्त करण...
एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

क्राइम
धर्माबाद/निझामाबाद | क्रिकेट सट्टा प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला अखेर धर्माबाद व निझामाबाद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरण निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाण्यात गु.र.नं. 66/2025 अंतर्गत दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2), 316(2), 111 तसेच आयटी अॅक्ट 66-D, 69(A) व सह ३, ४ तेलंगणा जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ दरम्यान क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याचवेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर (पो.स्टे. धर्माबाद) यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी मनोज मानधनी हा धर्माबाद येथे आला आहे. त्यानुसार निझामाबादच्या North Rural CI यांच्या पथकासोबत संयुक्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला अ...
error: Content is protected !!