Tag: जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण जेरबंद, १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण जेरबंद, १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ५ मे रोजी सायंकाळी लिमरा हिल्स कॉलनी परिसरात, बंधारा ब्रिजजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर...
“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत भाग्यनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; 4.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत भाग्यनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; 4.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत “ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 02 मे 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अरुणोदय नगर परिसरात “आंदर-बाहर” जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन तसेच दुचाकी वाहने असा एकूण ₹4,52,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 239/2026 नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. ही कारवाई अविनाश कुमार (पोलीस अध...
कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

कुंडलवाडी पोलीसांची धडक कारवाई : अवैध जुगार अड्ड्यावर छापा

क्राइम
12 जणांवर गुन्हा; 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त कुंडलवाडी| कुंडलवाडी पोलीसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 एप्रिल रोजी सायंकाळी पिंपळगाव (कु) शिवारातील दगडे यांच्या शेताजवळ करण्यात आली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे काही इसम ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. त्यानुसार कुंडलवाडी पोलीसांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 24,400 रुपये रोख रक्कम, 52 पत्ते, 4 मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. 43/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोना/22...
error: Content is protected !!