हिमायतनगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’चे आयोजन
नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवांचा लाभ
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी ९.०० वाजता शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे पार पडणार आहे.
या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण (डिजिटल स्वाक्षरीसह), उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जमीन अभिलेख अद्ययावत करणे, ई-मोजणी अर्ज, तसेच अकृषक (एनए) तरतुद...



