Tag: आरोपी जेरबंद

नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड विमानतळ हद्दीत घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख नईम शेख महेबुब (वय २२, रा. माळटेकडी, म्हाळजा, नांदेड) व शेख रहेमान उर्फ भेंडी शेख अशपाक (वय १९, रा. मखदुम नगर, नई आबादी, नांदेड) अशी ...
नांदेड LCBची मोठी कारवाई; 2.25 किलो गांजासह आरोपी जेरबंद

नांदेड LCBची मोठी कारवाई; 2.25 किलो गांजासह आरोपी जेरबंद

क्राइम
नांदेड| स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेडने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत सुमारे ₹1 लाख 12 हजार किमतीचा 2 किलो 251 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचाही तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शंकरराव चव्हाण चौक परिसरात एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. 17 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजता महशीचा बाजार परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडून प्लास्टिक पिशवीत ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला. आरोपी सय्यद सदरु सय्यद सलीम (वय 29, रा. सांगवी, नांदेड),  शेख शफी (रा. महेबूबनगर, नांदेड) त्यांच्याकडून 2 किलो 251 ग्रॅम गांजा अंदाजे किंमत ₹1,12,550...
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध शस्त्र जप्त, १७ आरोपी जेरबंद

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध शस्त्र जप्त, १७ आरोपी जेरबंद

क्राइम
नांदेड | नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्यावर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईत ७ अवैध अग्निशस्त्रांसह ७६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून तब्बल १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही विशेष मोहीम १ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या मोहिमेत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७ अग्निशस्त्र, ७६ काडतुसे आणि ३ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. अवैध शस्त्र बाळगणे हे केवळ गंभीर गुन्हा नसून समाजासाठी मोठा धोका ठरत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासना...
error: Content is protected !!