Tag: आयोजन

विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

क्रीडा
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. १५ ते २९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.०० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पार पडणार आहे. या शिबिरासाठी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, क्लब, अकादमी तसेच क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी आपण घेऊ इच्छित असलेल्या खेळांचे नाव, प्रशिक्षणाचे स्थळ व वेळ (सकाळ/सायंकाळ) नमूद करून लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र द...
कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

आरोग्य
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने कामारी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, कामारी येथे पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, उपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध वितरणाचीही सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी मुरलीधर उमाटे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता) – 9921112903, आमदार बाबुराव कदम कोहळीकर सं...
error: Content is protected !!