तृतीयपंथीयांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अतुल सावे
नांदेडमध्ये तृतीयपंथीयांसाठी तीन एकर जागा; खासदार निधीतून ३० लाखांची तरतूद — सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात चर्चासत्र व जनजागृती
नांदेड | तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. नांदेड शहरात तृतीयपंथीयांच्या विकासासाठी तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. भविष्यात विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड आणि विशेष सहाय्यक, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव २०२६’च्या दुसऱ्या दिवशी कुसुम सभागृह, नांदेड येथे तृतीय पंथीयांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, जनजागृती आणि रोजगाराच्या संधींबाबत कार्य...


