चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड| अवैध चंदन तस्करीविरोधात नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरहून मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होणार होती. त्यानुसार, लोहा-नांदेड मार्गावरील सई हॉटेलजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले, मात्र तपासात ड्रायव्हरच्या मागील बाजूस बनवलेल्या गुप्त कप्प्यात चंदन लपवून ठेवले असल्याचे उघड झाले.
या कप्प्यातून 1,470 किलो वजनाचे सुमारे 36.75 लाख रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. तसेच आयशर वाहन आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 51.96 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी तुकाराम बुंदराळे, तौफिक देशमुख, रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपा...









