कुणबी मराठा महासंघाच्या वतीने महापौर कविता मुळे यांचा हिमायतनगरात जंगी सत्कार

फटाक्यांची आतषबाजी व भव्य पुष्पहाराने केले उत्स्फूर्त स्वागत

हिमायतनगर, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांचे हिमायतनगर शहरात आगमन होताच कुणबी मराठा महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच हिमायतनगर शहरात आगमन झाल्याने महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी महापौर सौ. कविता मुळे यांचा कुणबी मराठा महासंघाच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक प्रजावाणीचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद करवा यांचाही यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक तुजलैश यादव, साहेबराव गायकवाड, अभिषेक सौदे, सुमित मुथा, भालचंद्र पवळे, अपूर्व देशमुख आदी उपस्थित होते.

Oplus_16908288

हा कार्यक्रमास भाजपाचे नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्या निवासस्थानी पार पडला. याप्रसंगी कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष नारायणराव माने, उपाध्यक्ष राम पतंगे पारवेकर, प्रकाश पाळजकर, मुन्ना शिंदे, बालाजी ढोणे, गजानन पाळजकर, परमेश्वर वानखेडे, अरविंद वानखेडे, किरण वानखेडे, ओंकार कीरकन, संतोष साबळकर, परमेश्वर सूर्यवंशी, विनोद दुर्गेकर, विलास वानखेडे, नागोराव शिंदे यांच्यासह कुणबी मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर कविता मुळे यांच्या हिमायतनगर आगमनानिमित्त झालेल्या या स्वागतामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी महापौर मुळे यांना पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!