
महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण; शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प
नांदेड, प्रतिनिधी| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन नांदेड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०५ वाजता महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.



ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने झाली. ध्वजारोहणानंतर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगान व राज्यगीत सादर केले. पोलीस दल तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महापौर कविता संतोष मुळे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खऱ्या अर्थाने देशसेवा ठरेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.



मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आपल्या संदेशात सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. शहरातील विकासकामांना अधिक गती देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमास उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, गटनेते संदीपसिंग गाडीवाले यांच्यासह माजी पदाधिकारी, सन्माननीय सदस्य तसेच महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजीत वायकोस, नितीन गाढवे, सहायक आयुक्त अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगररचनाकार ओम लहाने, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकलीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, क्रीडा अधिकारी रमेश चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रईसोद्दीन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, शिक्षण अधिकारी प्रवीणा मांदळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, सतीश ढवळे, खुशाल कदम, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, नागनाथ पतंगे, विठ्ठल तिडके, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, मालमत्ता व्यवस्थापक पद्माकर कावळे आणि जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले.
