
माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जागवल्या खा. स्व. वसंतराव चव्हाण यांच्या आठवणी



मुखेड/नांदेड| स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नायगाव येथे करण्यात आले. यावेळी मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, भोकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.



यावेळी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार हे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांचे खास व जवळचे मित्र म्हणून परिचित होते. यावेळी बाबुराव देबडवार यांनीही स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची आठवण करताना अनेक प्रसंग कथन करण्यात आले. या आठवणींना उजाळा देत असताना खासदार रवींद्र चव्हाण भाऊक झाले.



या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’चे संपादक ज्ञानेश्वर डोईजड आणि ज्येष्ठ पत्रकार राजेश बंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


