सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी देवराव हनवते यांचे निधन

हिमायतनगर, प्रतिनिधी| खडकी बा. येथील ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी देवराव रुपाजी हनवते (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) रात्री ८ वाजता नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने खडकी बा. परिसरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या परिचितांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

देवराव हनवते यांनी रेल्वे विभागात प्रदीर्घकाळ सेवा बजावून सेवानिवृत्ती घेतली होती. ते येथील पत्रकार शुद्धोधन हनवते यांचे वडील होते. सामाजिक व कौटुंबिक जीवनात मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा परिचय होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळ गावी खडकी बा. येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!