नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : हिमायतनगरमध्ये कुणाचा ‘सहकार’ मजबूत?

मतदान पार पडले; आता निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. हिमायतनगर गटात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि विशाल राठोड यांच्यात झालेल्या थेट लढतीमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मतदानाच्या आधीपासूनच दोन्ही गटांनी मतदारांशी संपर्क साधत आपापली राजकीय ताकद पणाला लावली होती. सहकाराच्या निवडणुकीच्या निमित्ताने हिमायतनगरमध्ये पुन्हा एकदा राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.

मतदानानंतर आता प्रत्येक गटाकडून विजयाचे दावे केले जात असले, तरी खरा कौल मतपेटीत बंद झाला आहे. त्यामुळे २८ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या निकालात मतदारांनी कोणाच्या बाजूने आपला विश्वास व्यक्त केला, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांचं पारड जड असल्याचा दावा केला जातो आहे.

मात्र निकालातून माधवराव पाटील जवळगावकर यांचा सहकारातील अनुभव विजय मिळवणार? की विशाल राठोड यांच्या माध्यमातून मतदार नवा पर्याय निवडणार? हिमायतनगरच्या राजकीय पटावर या निकालाचे पडसाद उमटणार आहेत. सहकाराच्या निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!