पावसासाठी मारोती रायाला साकडे ; पळशीकर परिवारातर्फे हजारो नागरिकांना अन्नदान

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब हेरून वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी संदीप अप्पा पळशीकर परिवार व निलेश कोटगीरवार यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील अभिषेक ट्रेडिंग कंपनीसमोर अन्नदान पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.

oplus_2097152

यापूर्वी मारोती मंदिरात विधिवत पूजा-अर्चा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर अन्नदानाच्या पंगतीला सुरुवात झाली. या अन्नदानाचा हजारो नागरिक तसेच महामार्गावरून जाणाऱ्या महिला-पुरुष वाटसरूंनी लाभ घेतला.

oplus_48

यावेळी रमेश अप्पा पळशीकर, प्रवीण जन्नावार, बाळूअण्णा चवरे, संतोष अप्पा पळशीकर, मारोतराव लुमदे पाटील, पुंडलिक यनगुलवार, रऊफ ताया, पतरूभाई, अफरोज भाई, संजय आचारी, आकाश ढोणे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अंकुश तवर, तानाजी सवणेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पावसासाठी श्रद्धेने आयोजित करण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

oplus_48
Oplus_16908288

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!