नांदेड जिल्ह्यासाठी १७ व १८ जुलैला यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी १७ व १८ जुलै २०२६ रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

विजांच्या कडकडाटावेळी काय करावे?

  • हवामानाचा इशारा असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळावे.
  • सुरक्षित इमारतीत तातडीने आश्रय घ्यावा.
  • सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागेत गुडघ्यात डोके घालून बसावे.
  • घरातील विद्युत उपकरणे बंद करावीत.
  • विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.
  • पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.

काय करू नये?

  • विजांच्या कडकडाटावेळी लँडलाईन फोनचा वापर करू नये.
  • शॉवरखाली अंघोळ करू नये.
  • बेसिनचे नळ, पाण्याच्या पाइपलाइन किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.
  • लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये.
  • उंच झाडाखाली किंवा धातूच्या मनोऱ्याजवळ उभे राहू नये.
  • घरात असतानाही उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहणे टाळावे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!