सिडको मोढा प्रकल्पातील श्री अष्टविनायक गणपती मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. आनंद पाटील बोंढारकर

मंदिराकडे जाणारा सिमेंट काँक्रीट रस्ता आमदार निधीतून; गणपती नगर नामफलकाचे अनावरण
नवीन नांदेड | सिडको मोढा प्रकल्पातील श्री अष्टविनायक गणपती मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, मंदिराकडे जाणारा मुख्य सिमेंट काँक्रीट रस्ता लवकरच आमदार निधीतून करण्यात येईल, असे आश्वासन आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिले.

रविवारी (१२ जुलै) सिडको मोढा प्रकल्पातील आरके-एमके परिसरातील श्री अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान येथे आयोजित ‘गणपती नगर’ नामफलक अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. बोंढारकर यांच्या हस्ते गणपती नगर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला साई हिरो होंडाचे संचालक दिलीप भाऊ भगिले, मोरे पाटील, खराणे पाटील, गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. बोंढारकर यांनी मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आमदार निधीतून लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष शिवराम पाटील बेटमोगरेकर, सचिव प्रा. रमेश नांदेडकर व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंकर बोकारे, गिरीश कुलकर्णी, सुधीर जोशी दांडेगावकर, पोरडवार, माधवराव मस्कले, केंद्रे, राजेश टेंभुरणे, पिपाधरे, वानखेडे, मैत्री, अरुण कुलकर्णी गुंटुरकर, संजय जाधव, योगेश संगेवार, पोलीस निरीक्षक केंद्रे, प्रविण मंत्री, महिपती शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!