कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार यांचा होणार गौरव; ग्रंथप्रकाशनाचाही सोहळा

नांदेड| प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, नांदेड येथे उत्साहात संपन्न होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशनही होणार आहे.

यंदाच्या सोहळ्यात ‘मातृश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता, मुंबईचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

‘प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार’ यंदा कवी अजीम नवाज राही (बुलडाणा) यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या साहित्यकृतीला जाहीर झाला.

राज्यस्तरीय ‘प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार’ संगीता अरबुने यांच्या ‘एकसोबीस हरी पती लॉंग आणि मी’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे.

स्थानिक स्तरावरील ‘प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार’ डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या ‘हे बंध समाज निष्ठेचे’ (आत्मकथन) या ग्रंथाला जाहीर झाला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘प्रसादपर्व’ या रौप्य महोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन तसेच ‘ज्वालामुखीच्या प्रदेशात’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. साहित्यप्रेमींसाठी हा दुहेरी ग्रंथप्रकाशन सोहळा विशेष पर्वणी ठरणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सुरेश सावंत (निमंत्रक, वाङ्मय पुरस्कार समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, डॉ. अच्युत प्रसाद बन, अध्यक्ष, प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड,. तसेच संजीव कुलकर्णी यांचेही कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!