प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद आवश्यक; विशेष पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करा – तहसीलदार पल्लवी टेमकर

हिमायतनगर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देत मतदारांशी साधला संवाद
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद होणे ही सक्षम लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

शुक्रवारी तालुक्यातील मौजे कारला येथील मतदान केंद्राला भेट देताना तहसीलदार टेमकर यांनी बीएलओ नारायण काळे यांच्याकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाची माहिती घेतली. यावेळी मुख्याध्यापिका आशाताई बोयले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना तहसीलदार पल्लवी टेमकर म्हणाल्या की, बीएलओ घरोघरी येऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी त्यांना योग्य व अचूक माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत, जेणेकरून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण, बीएलओ नारायण काळे, माजी चेअरमन परमेश्वर पाटील लुम्दे, पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. गफार, शिक्षक धनुसकर, माजी सरपंच रामेश्वर यमजलवाड, राजेश ढाणके, संजय गोखले, सोपान बोंपीलवार, तुकाराम कदम, लक्ष्मण ढाणके, कैलास कांबळे, नागोराव गोणेवाड, साहेबराव घोडगे, अगंद सुरोशे, नागेश कांबळे यांच्यासह गावातील अनेक मतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!