
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांचा सन्मान सोहळा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक वितरण; कृषी विभागात आनंदाचे वातावरण
मुंबई | कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषिमंत्री दत्ता भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, फलोत्पादन मंत्री भारतशेठ गोगावले, प्रधान सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला.


यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वसंत जारीकोटे, राज्य सरचिटणीस महेंद्र गजभिये, हिंगोली जिल्हा राज्य प्रतिनिधी राजेश भिसे आणि सहाय्यक कृषी अधिकारी रूपाली ठाकरे (अमरावती) यांनी प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉप स्वीकारले.



संघटनेच्या माहितीनुसार, राज्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना येत्या १५ दिवसांत लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. संघटनेची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी शासनाने मान्य केल्याने राज्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संवर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
