सहस्रकुंड बाणगंगा येथे भव्य शिवपुराण कथा महोत्सव; २९ जूनपासून भक्तिमय पर्वाला सुरुवात

परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे वर्णन

हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट -हिमायतनगर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर देवस्थान येथे येत्या 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून भगवान महादेवांच्या दिव्य महिमेचे रसाळ व भक्तिमय निरूपण होणार असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक 29 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत भव्य संगीतमय शिवपुराण कथा दररोज दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या चालणार असून, कथेनंतर दररोज महाप्रसाद वितरण होईल. दिनांक 6 जुलै रोजी काल्याच कीर्तन होऊन भव्य महाप्रसादाने कथा महोत्सवाचा समारोप होणार आहे. भगवान शंकराच्या महिमेचे श्रवण करून आध्यात्मिक आनंद, पुण्यप्राप्ती व शिवकृपेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहस्त्रकुंड बानगंगा महादेव मंदिर कमेटीच्या वतीने सतीश वाळकीकर यांनी केले आहे. यावेळी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व अनेकांची उपस्थिती होती.

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैंनगंगा नदिकावर असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या महादेव मंदिरात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे. शिवभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार असून, जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहस्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर देवस्थान समिती यांच्या वतीने या कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 28 रोजी पिंपळगाव येथील मठाधीपथी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांची देखील कथेला उपस्थिती लाभणार आहे. एकूणच सहस्त्रकुंड इस्लापूर परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून शिवपुराण कथेचा पुण्यलाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!