नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली!

पक्षीय बलाबल स्पष्ट; महायुती मजबूत, पण महाविकास आघाडीचीही जोरदार फिल्डिंग

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा राजकीय पट दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, पक्षीय बलाबलाच्या आकडेवारीमुळे निवडणुकीचे समीकरण चांगलेच चर्चेत आले आहे. एकूण 446 मतदार असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ मजबूत दिसत असले तरी, महाविकास आघाडी, एमआयएम आणि अपक्षांची भूमिका अंतिम निकालात गेमचेंजर ठरू शकते.

विशेष म्हणजे, 18 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.

महायुतीचे पारडे जड?

उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  • भाजप – 138
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 82
  • शिवसेना (शिंदे गट) – 23
  • मराठवाडा जनहित पार्टी – 39

➡️ महायुती संभाव्य एकूण : 282

महाविकास आघाडीही मैदानात सज्ज

दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपली ताकद कायम ठेवली असून, विरोधी मतांचे एकत्रीकरण निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकते.

  • काँग्रेस – 92
  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 19
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 13
  • वंचित बहुजन आघाडी – 6

➡️ महाविकास आघाडी संभाव्य एकूण : 130

‘किंगमेकर’ कोण ठरणार?

याशिवाय एमआयएमचे 20 आणि 14 अपक्ष मतदार हे निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. स्थानिक राजकीय समीकरणे, नाराजी, क्रॉस व्होटिंग आणि गुप्त मतदान पद्धतीमुळे सध्या दिसणारे गणित मतदानाच्या दिवशी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राजकीय गणितानुसार महायुतीचे पारडे जड दिसत असले, तरी विधानपरिषद निवडणुकीतील गुप्त मतदानाची परंपरा पाहता अंतिम निकालापर्यंत कोणतीही बाजू निश्चित मानण्यास राजकीय विश्लेषक धजावत नाहीत. त्यामुळे नांदेड विधानपरिषद निवडणूक यंदा प्रतिष्ठेची आणि तितकीच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!