बुद्ध भीम महोत्सव समितीच्या वतीने 30 एप्रिल रोजी ‘बुद्ध पहाट’चे आयोजन

नागपूरच्या जाधव सिस्टर्स यांच्या सुरेल गीतांची नांदेडकरांना मेजवानी

नांदेड| भगवान गौतम बुद्ध यांच्या 2589 व्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम महोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने यावर्षीही ‘बुद्ध पहाट’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 30 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात नागपूर येथील सुप्रसिद्ध जाधव सिस्टर्स आपल्या सुरेल आवाजात बुद्ध-भीम गीतांची मेजवानी सादर करणार आहेत. त्यामुळे नांदेडकरांना एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.

भगवान बुद्ध जयंतीनिमित्त गेल्या 17 वर्षांपासून बुद्ध-भीम महोत्सव समितीच्या वतीने ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात येत आहे. या काळात देशातील अनेक नामवंत गायकांच्या संगीतमय कार्यक्रमांद्वारे या उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. यावर्षी हा कार्यक्रम 17 व्या वर्षात पदार्पण करत असून, नागपूरचे मिलिंद जाधव प्रस्तुत जाधव सिस्टर्स यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याचवेळी श्रीलंका तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेशना व पूजापाठही आयोजित करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक व संगीतमय ‘बुद्ध पहाट’ कार्यक्रमास बौद्ध बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!