उदगीरात मराठी पत्रकार अधिवेशनासाठी सभामंडपाचे भूमिपूजन

उदगीर | उदगीर येथे येत्या 18 व 19 एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

हे अधिवेशन उदगीरमधील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात येत असून, दोन दिवसीय कार्यक्रमात विविध समकालीन विषयांवर परिसंवाद होणार आहेत. राज्यभरातील नामवंत पत्रकार, तसेच युवा राजकीय नेते या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या अधिवेशनासाठी संकुलात भव्य व सुसज्ज सभामंडप उभारण्यात येत असून, तयारीला वेग आला आहे.

यावेळी लातूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव व मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, संयोजन समितीचे युवराज धोतरे , बिभीषन मद्देवाड ,अर्जुन जाधव , सिद्धार्थ सुर्यवंशी , ज्योती स्वामी व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे,  हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, रसूल पठाण, रामदास केदार, संदीप निडवदे , अनिल जाधव, विक्रम हलकीकर, मनोहर लोहारे, विश्वनाथ गायकवाड, माधव रोडगे, श्रीधर सावळे, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह पत्रकार, स्वामी विवेकानंद संस्थेतील कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!