Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeमहाराष्ट्रक्रीडाविभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड अव्वल; विजेतेपदाची परंपरा कायम

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड अव्वल; विजेतेपदाची परंपरा कायम

नांदेड| परभणी येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये नांदेड जिल्हा ने दमदार कामगिरी करत तब्बल ३५५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या विजयामुळे जिल्ह्याने आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली आहे. जालना जिल्हा द्वितीय, तर आयोजक परभणी जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला.

नांदेड जिल्ह्यातील १९८ खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत, तर ४२ कलाकारांनी सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल आणि ४×१०० रिले (पुरुष) मध्ये प्रथम क्रमांक मिळवत नांदेडने आघाडी घेतली. तसेच खो-खो (पुरुष), जलतरण ४×५० रिले, संचलन तसेच ४×१०० व ४×४०० रिले (महिला) मध्ये द्वितीय, तर टर्फ क्रिकेट (महिला), खो-खो (महिला) आणि जलतरण ४×५० रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळवण्यात यश मिळाले.

वैयक्तिक क्रीडा प्रकारातही जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, धावणे, लांब उडी, थाळी फेक, बुद्धिबळ, कॅरम आदी स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक प्रथम क्रमांक पटकावले.

सांस्कृतिक स्पर्धेतही नांदेड जिल्ह्याने आपली छाप पाडली. एकूण १५ पैकी १२ कलाप्रकारांत उत्कृष्ट सादरीकरण करत सांस्कृतिक विभागातही प्रथम क्रमांक मिळवण्यात यश आले. उत्कृष्ट निर्मितीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी डॉ. रत्नदीप गायकवाड, तर उत्कृष्ट निवेदनासाठी डॉ. रत्नदीप गायकवाड आणि छाया नागर्थवार यांना प्रथम क्रमांक मिळाला.

विशेष म्हणजे, वैयक्तिक गायन स्पर्धेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय युगल नृत्य, समूह नृत्य आणि दंडार या लोककला प्रकारांतही प्रथम क्रमांक मिळाला. प्रियंका पवार–कर्डिले यांच्या समूह गायन चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!