पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विजयी

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित पश्चिम विभागीय खो-खो (मुले) स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. पाच दिवस रंगलेल्या या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ने द्वितीय, यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ने तृतीय, तर मुंबई विद्यापीठ ने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण ५८ संघांनी सहभाग नोंदविला.

समारोप सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, बाबा कुलदीपसिंग महाराज, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, विभागीय सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले, एआययूचे निरीक्षक डॉ. जगदीश गस्थी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नारायण चौधरी, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. पराग खडके, अधिसभा सदस्य युवराज पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, स्पर्धा समन्वयक डॉ. पवन पाटील तसेच क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांची उपस्थिती होती.

यावेळी विजेता, उपविजेता तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पदक देऊन सन्मान करण्यात आला. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. महेश बेंबडे, डॉ. महेश वाखरडकर, डॉ. माधव कदम, डॉ. अशोक चाटसे, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. गणेश मनगिरे तसेच क्रीडा विभागातील संजयसिंह ठाकुर, रामा किरकन, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, रतनसिंग पुजारी यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेसाठी पंचप्रमुख प्रशांत पाटणकर, निरीक्षक संदीप तावडे, संतोष सावंत, प्रभाकर काळे, दीपक सपकाळ, रणजीत जाधव, अंकुश चव्हाण, सचिन तहानिक, अमोल मुरकुळे, सुजित माळी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. भीमा केंगले यांनी केले. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली. या स्पर्धेमुळे खो-खो क्रीडेचा रोमांच अनुभवायला मिळाला असून मराठवाड्याच्या क्रीडा परंपरेला नवे बळ मिळाल्याची भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!