क्राइम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाच्या धाडी

नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाच्या धाडी

क्राइम
नकली जर्दा प्रकरणाचा पर्दाफाश; जुगार अड्ड्यावर छापा, 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने जिल्ह्यात धडक कारवाया करत अर्धापुर येथे नकली जर्दा बनविणाऱ्या इसमाचा पर्दाफाश केला, तर देगलूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. अर्धापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40) हा नकली सुगंधित जर्दा तयार करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या वेळी सुगंधित जर्दा, जर्दा तयार करण्याची मशीन, ग्लिसरीन व पॅराफिन असा एकूण 3,44,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कमी प्रतीच्या जर्द्यात रासायनिक पदार्थ मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने पॅकिंग करून विक्री करत असल्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा; पोलीस निरीक्षक चिंचोलकरांचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा; पोलीस निरीक्षक चिंचोलकरांचे आवाहन

क्राइम
नवीन नांदेड | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पण शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले. ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, अग्निशमन दलाचे अधिकारी, परिवहन विभाग, महापालिका, महावितरणचे अधिकारी तसेच जयंती मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, असेही त्यांनी सांगितले. डीजे मुक्त जयंतीचा संदेश जयंती साजरी करताना डीजे टाळून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम घेण्यावर भर द्यावा, असेही चिंचोलकर यांनी स्पष्ट केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात ठेवत समाजाने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासनाची समन्वय बैठक 10 एप्रिल रोजी झालेल्या या...
नांदेड जिल्ह्यात ‘मास रेड’; अवैध दारू, जुगार व गुटख्यावर पोलिसांची मोठी कारवाई

नांदेड जिल्ह्यात ‘मास रेड’; अवैध दारू, जुगार व गुटख्यावर पोलिसांची मोठी कारवाई

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी धडक कारवाई करत विविध ठिकाणी ‘मास रेड’ राबवली. या कारवाईत अवैध दारू, हातभट्टी, जुगार आणि गुटखा व्यवसायावर कारवाई करत 2 लाख 32 हजार 662 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 एप्रिल रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी-अंमलदार सहभागी झाले होते. 60 गुन्हे दाखल, 65 आरोपींवर कारवाई मास रेड दरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 60 गुन्हे दाखल करण्यात आले असून 65 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाने संकेत ...
अवैध तलवार बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; नांदेड ग्रामीणची कारवाई

अवैध तलवार बाळगणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; नांदेड ग्रामीणची कारवाई

क्राइम
नांदेड | नांदेड ग्रामीण पोलीसांनी गस्तीदरम्यान अवैध तलवार बाळगून फिरणाऱ्या एका युवकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे 1 हजार रुपयांची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 387/2026 अंतर्गत शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुखीद शेख हबीब (वय 27, रा. वाजेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुप्त माहितीवरून छापा दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी वाजेगाव येथील गोदावरी नदीवरील छोट्या पुलाजवळ एक इसम तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता संबंधित आरोपी संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तलवार जप्त; गुन्हा दाखल पंचासमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीविरुद्ध शस्त्र अ...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांविरोधात विशेष मोहीम; पहिल्याच दिवशी मोठी कारवाई

नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांविरोधात विशेष मोहीम; पहिल्याच दिवशी मोठी कारवाई

क्राइम, स्थानिक
नांदेड | आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिलदरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. गुटखा विक्रीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123 अंतर्गत 2 गुन्हे दाखल करून 1 लाख 17 हजार 642 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. घातक शस्त्रांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत शस्त्र अधिनियमांतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींकडून 57 हजार 822 रुपयांच्या तलवारी व खंजर जप्त करण्यात आले असून, एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ‘खबर’ हेल्पलाइनद्वारे माहिती द्या अवैध व्यवस...
नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहीम; ९५४ अनियमित प्रवासी आढळले

नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहीम; ९५४ अनियमित प्रवासी आढळले

क्राइम
रेल्वे प्रशासनाकडून ५.९९ लाखांचा दंड वसूल नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात प्रवाशांमध्ये नियमांचे पालन वाढवण्यासाठी आणि तिकीटविना प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ९५४ अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून ५ लाख ९९ हजार १४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत तिकीटविना प्रवास करणाऱ्यांची ६८१ प्रकरणे समोर आली असून त्यांच्याकडून ४ लाख ७९ हजार २०५ रुपये वसूल करण्यात आले. तसेच अनियमित प्रवासाच्या १७७ प्रकरणांमध्ये १ लाख ५ हजार १८५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय नोंद न केलेल्या सामानाची ९६ प्रकरणेही आढळून आली. या विशेष मोहिमेत एकूण १६८ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यात २७ तिकीट तपासणी पथक सदस्य, १२९ वाणिज्य व प्रवासी सुविधा विभागातील कर्मचारी आणि १२ स्थानक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विभागातील विविध स्थानक...
नांदेडमध्ये पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; 5 दिवसांत 97 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई

नांदेडमध्ये पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; 5 दिवसांत 97 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई

क्राइम
ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी मोहीम; 73 गुन्हे दाखल नांदेड| शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशनला मोठे यश मिळाले आहे. मागील पाच दिवसांत 97 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून 73 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 एप्रिल रोजी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या ऑपरेशनदरम्यान चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार/हद्दपार आरोपी, हिस्ट्रीशीटर आणि सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. 97 पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई, 85 आरोपींवर थेट कारवाई, एकूण 73 गुन्हे दाखल, ...
नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 394 केसेस, 4.48 लाखांचा दंड वसूल

नांदेडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; 394 केसेस, 4.48 लाखांचा दंड वसूल

क्राइम
अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई नांदेड| शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखा वजिराबाद आणि इतवारा पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत एकूण 394 प्रकरणे नोंदवून 4 लाख 48 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरात सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना/परमिट वाहने, ट्रिपल सीट, भरधाव वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणारे अनधिकृत फळ गाडे व हातगाडे यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. शहर वाहतूक शाखा इतवारा येथील पोलीस निरीक्षक जगन पवार यांनी जुना मोंढा, हबीब टॉकीज, बकी चौक परिसरात तपासणी मोहीम राबवून 42 प्रकरणे नोंदवली व 46,500 रुपयांचा दंड आकारला. तर शहर वाहतूक शाखा वजिराबादचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांन...
नांदेडमध्ये स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई; अवैध खंजरासह दोघांना अटक

नांदेडमध्ये स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई; अवैध खंजरासह दोघांना अटक

क्राइम
40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त; भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड| शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध खंजर बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026, कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरविंदर सिंग गंगाचरसिंग येवते (रा. गाडीपूरा, इतवारा) आणि हरप्रीतसिंग केशरसिंग लांगरी (रा. शहीदपुरा, नांदेड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कॉम्बिंग ऑपरेशन व गस्त सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैध हत्यार घेऊन फिरत आहेत. त्यानुसार स्ट्रिट सेफ्टी पथकाने भाग्यनगर रोडवरील पागल टी हाऊससमोर सापळा रचला. संशयितांना ताब्य...
हिमायतनगर ते पोटा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग बनतोय अपघाताचा हाॅटस्पॉट

हिमायतनगर ते पोटा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग बनतोय अपघाताचा हाॅटस्पॉट

क्राइम
नांदेड–किनवट महामार्गावर दुहेरी बळी; अपघातांनी घेतला धोकादायक वळण सरसम परिसर पुन्हा हादरला; नागरिकांकडून रस्ता सुरक्षेवर प्रश्न हिमायतनगर| नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम इंदिरा नगर ते म्हसोबा नाल्याच्या मध्ये मोटरसायकल आणि एका अज्ञात वाहनामध्ये जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, लखन प्रदीप पांडे (वय 25, रा. सरसम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अविनाश गणेश गोखले यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर रमेश गुंडेकर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर संबंध...
error: Content is protected !!