Tag: 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई करत नवीन मोंढा परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ३१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३० एप्रिल रोजी नवीन मोंढा भागातील जय गुरुदेव पान शॉपजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये चार जण मटका खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता १५,७७० रुपये रोख रक्कम व १५,५०० रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ३१,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान मटका अड्ड्याचे मालक अब्बास (रा. नई आबादी, शिवाजीनगर), शेख जमीर (रा. इतवारा) तसेच बुकी म्हणून संजय गाय...
नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका तरुणाच्या ताब्यातून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई इतवारा, नांदेड पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2026 अंतर्गत भा.ह.का. कलम 3/25, 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम ऊर्फ बबलुलाला आनंद लोखंडे (वय 22, रा. संघसेन नगर, इतवारा) हा अवैधरीत्या गावठी पिस्टल विक्रीसाठी बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पथकाने 15 एप्रिल 2026 रोजी संघसेन नगर परिसरात छापा टाकून संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत एक लोखंडी गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, जो पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्य...
error: Content is protected !!