जालना–नांदेड समृद्धी महामार्गग्रस्त १२ गावांतील शेतकऱ्यांची २५ एप्रिलला बाभुळगाव फाट्यावर निर्णायक बैठक
नवीन नांदेड, प्रतिनिधी | जालना–नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे बाधित झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. २५ एप्रिल रोजी बाभुळगाव फाटा (ता. नांदेड) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीने दिली आहे.
नांदेड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शासनाने अत्यंत कमी दराने जमीन घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शेतकरी पाठपुरावा करत असले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, बागायती व शहरालगत असलेल्या सुपीक जमिनींचेही कवडीमोल दराने संपादन करण्यात आले. याशिवाय आता इंटरचेंज व इतर कामांसाठी पुन्हा संयुक्त मोजणीच्या नोटिसा बजावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वा...
