हरडफ फाट्यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजले; शरद कदम यांच्या पाठपुराव्याला यश
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्यातील हरडफ फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत युवा नेते शरद कदम यांनी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार कदम यांनी तत्काळ मुरूम उपलब्ध करून देत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या पावसाळ्यामुळे हरडफ फाट्यावरील सुमारे ३०० मीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, ठेकेदाराने ३०० मीटरचा भाग अपूर्ण सोडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोशल मीडियाव...

