हरडफ फाट्यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजले; शरद कदम यांच्या पाठपुराव्याला यश

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्यातील हरडफ फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत युवा नेते शरद कदम यांनी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार कदम यांनी तत्काळ मुरूम उपलब्ध करून देत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या पावसाळ्यामुळे हरडफ फाट्यावरील सुमारे ३०० मीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, ठेकेदाराने ३०० मीटरचा भाग अपूर्ण सोडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला होता.

युवा नेते शरद कदम यांनी ही समस्या आमदार बाबुराव पाटील कदम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता हायवा ट्रकद्वारे मुरूमाची व्यवस्था केली. त्यांच्या निर्देशानुसार एका दिवसात खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

Oplus_16908288

रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने वाहनचालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांनी आमदार बाबुराव पाटील कदम यांचे आभार मानले असून, प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे युवा नेते शरद कदम यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!