समाजाच्या एकजुटीतच प्रगतीचा मार्ग; तेलंगणा–महाराष्ट्र संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन
बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी व माला दासरी समाज एकच; शासन लाभांसाठी मजबूत संघटना उभारण्यावर भर
भोकर/हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “समाज संघटना मजबूत असेल तरच समाजाला न्याय, दिशा आणि प्रगती मिळू शकते. आपसातील मतभेद विसरून समाजाच्या व भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन निझामाबाद बुक्कायावारू संगमचे अध्यक्ष रमेश सादुल्ला यांनी केले. ते तेलंगणा–महाराष्ट्र, दासरी, माला दासरी, बुक्का आयावरू व आय्यावरू समाज संघटनेची भोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी बोलताना रमेश सादुल्ला यांनी सांगितले की, शासनाच्या मागील जनगणनेतील त्रुटींमुळे अल्पसंख्यांक समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या प्रवर्गात विभागले गेले आहेत. प्रत्यक्षात बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी आणि माला दासरी समाज हा एकच असून व्यवसाय, कुलदैवत तसेच रोटी-बेटी ...
