Tag: ‘सखी वन स्टॉप सेंटर’

‘सखी’ वन स्टॉप सेंटरमुळे नांदेडमध्ये १,१७५ महिलांना आधार; संकटात ठरते विश्वासाचे ठिकाण

‘सखी’ वन स्टॉप सेंटरमुळे नांदेडमध्ये १,१७५ महिलांना आधार; संकटात ठरते विश्वासाचे ठिकाण

आरोग्य
नांदेड(प्रतिनिधी) घरगुती हिंसाचारापासून सामाजिक अन्यायापर्यंत विविध संकटांना सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी नांदेड येथील ‘सखी’ वन स्टॉप सेंटर हे केंद्र खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार १७५ महिलांना मदत मिळाली असून, शेकडो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे. महिलांना अनेकदा घराच्या चार भिंतीत किंवा सार्वजनिक ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो. अशा वेळी तक्रार कुठे करावी, मदत कुठून मिळवावी हा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘वन स्टॉप सेंटर’ अर्थात ‘सखी केंद्र’ ही संकल्पना सुरू केली. नांदेडमध्ये १७ जून २०१७ रोजी या केंद्राची स्थापना झाली असून, अल्पावधीतच हे केंद्र महिलांसाठी विश्वासाचे ठिकाण बनले आहे. विविध सेवांमुळे महिलांना दिलासा नांदेड सखी केंद्रात आतापर्यंत आलेल्या १,१७५ प्रकरणांमध्ये सर्व महिलांचे समुपदेशन करण्...
संकटात महिलांना आधार देणारे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतंय जीवनदायी केंद्र

संकटात महिलांना आधार देणारे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतंय जीवनदायी केंद्र

सामाजिक
नांदेड| महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना तातडीची व सर्वसमावेशक मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे नांदेडमध्ये महिलांसाठी सुरक्षित आधारस्थान ठरत आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आणि राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत, समुपदेशन तसेच सामाजिक व कौटुंबिक आधार एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जातो. विशेष म्हणजे, गरजूंना तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधाही येथे दिली जाते. महात्मा फुले मार्केटजवळील महिला व बालविकास भवनात सुरू असलेले हे केंद्र २४ तास कार्यरत असून, अनेक महिलांना संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा मोठा लाभ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, मानवी तस्करी किंवा आर्थिक शोषण अशा विविध प्रकारच...
error: Content is protected !!