शहापूर परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल
शेतात आठ हजारांचा भाव, बाजारात मात्र पाच हजारांवर; मजुरीच्या वाढत्या खर्चाचाही फटका
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला शहापूर परिसरात सुरुवात झाली असून, उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे पिकाला अपेक्षित उत्पादन मिळत नसताना दुसरीकडे बाजारभावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग व उडदाची लागवड केली होती. मूग व उडदाचे पीक वर्षभराच्या घरगुती गरजेपुरतेच घेतले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी कडधान्याची साठवण केली. मात्र, बाजारात पैसे मोजूनही मूग व उडदाची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मूग व उडदाची काढणी पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मजुरांकडून कापणीसाठी मोठी मजुरी मागितली जात असल्य...

